पुढची पिढी आत्मनिर्भर भारतासाठी, नवनिर्माणासाठी सज्ज होण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० होय. दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे. परंतु आता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचं महत्त्व कमी होणार आहे. मोदी सरकारने बुधवारी (२९ जुलै २०२०) नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली. तब्बल 34 वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.
महिलांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न, पूर्व प्राथमिक शिक्षांणाकडे विशेष लक्ष, व्यावसायिक शिक्षणाची आवश्यकता या मुद्द्यांचाही विचार नवीन शैक्षणिक धोरणात केलेले आहे. गरीब व श्रीमंत शिक्षणातील विषमता ही नवीन शैक्षणिक धोरणात विचारत घेतली आहे. म्हणून सरकारी आणि खासगी शाळेमध्ये शिक्षणात सामनता आणायची भूमिका प्रामुख्याने मांडण्यात आलीआहे. राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना करण्याची आणि खासगी शाळांना अनियंत्रित फी वाढविण्यापासून रोखण्याची शिफारस नवीन शैक्षणिक धोरणात करण्यात आलेली आहे. शिक्षणाचा आकृतिबंध बदलण्यात आला आहे. हे धोरण बालवाडी, अंगणवाडीपासून ते उच्च शिक्षणामध्ये लागू असणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरण २०२० विषयी
- धोरण केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालय यांनी सादर केला आहे.
- डॉ. कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा मसुदा तयार केला आहे.
- मसुदा मोदी सरकारच्या पहिल्या काळातच हा मसुदा तयार करण्यात आला होता.
- देशांत जवळ ३४ वर्षानंतर हे सुधारित नवीन शैक्षणिक धोरण सादर करण्यात आले आहे.
- स्वातंत्र्यानंतरच्या काळातील हे तिसरे धोरण आहे. ह्या अगोदर पहिले सन १९३८, दुसरे १९८६ आणि सध्या हे तिसरे २०२०.
- विद्यार्थ्यांना परीक्षार्थी न बनवता ज्ञानार्थी बनविण्याचा ह्या मागे उद्देश आहे.
- धोरणाअंतर्गत शिक्षणातील गुंतवणूक GDP च्या ६% करणार आहे, सध्या हि ४.४३% इतकी आहे.
नवीन शैक्षणिक धोरण २०२० - शालेय संरचना
- पूर्वी शाळेची संरचना १०+२ होती.
- सुधारित धोरणानुसार आता हि ५+३+३+४ अश्याप्रकारे असेल.
- विद्यार्थ्याचं शिक्षण २.५ किंवा ३ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सुरु होईल.
(१)पहिली पायरी - ५ वर्षे (Foundation Stage)
वय : ३ ते ८ वर्षे
अ) पूर्व प्राथमिक शिक्षण
१. नर्सरी (वय – ४ वर्षे)
२. छोटा शिशु (वय – ५ वर्षे)
३. मोठा शिशु (वय – ६ वर्षे)
आ) प्राथमिक शालेय शिक्षण
१. इयत्ता पहिली (वय – ७ वर्षे)
२. इयत्ता दुसरी (वय – ८ वर्षे)
(२) दुसरी पायरी – ३ वर्षे (Preparatory Stage)
वय – ८ ते ११ वर्षे
१. इयत्ता ३ री - (वय – ९ वर्षे)
२. इयत्ता ४ थी - (वय – १० वर्षे)
३. इयत्ता ५ वी - (वय – ११ वर्षे)
(३) तिसरी पायरी – ३ वर्षे (Middle Stage)
वय – ११ ते १४ वर्षे
१. इयत्ता ६ वी - (वय – १२ वर्षे)
२. इयत्ता ७ थी - (वय – १३ वर्षे)
३. इयत्ता ८ थी - (वय – १४ वर्षे)
(४) चौथी पायरी – ४ वर्षे (Secondary Stage)
वय – १४ ते १८ वर्षे
१. इयत्ता ९ वी - (वय – १५ वर्षे)
२. इयत्ता १० वी - (वय – १६ वर्षे)
३. इयत्ता ११ वी - (वय – १७ वर्षे)
४. इयत्ता १२ वी - (वय – १८ वर्षे)
सुधारित धोरणाअंतर्गत - अभ्यासक्रम
(१) पहिली पायरी - ५ वर्षे (Foundation Stage)
अ) पूर्व प्राथमिक शिक्षण
- ३ वर्षासाठी समान अभ्यासक्रम असेल.
- अभ्यासक्रम NCRT मार्फत ठरवला जाईल.
आ) प्राथमिक शालेय शिक्षण
- Multilevel Play, Projects based & Activity based learning
(२) दुसरी पायरी – ३ वर्षे (Preparatory Stage)
- Multilevel Play, Projects based & Activity based learning
- मुलभूत शिक्षण – अक्षर आणि संख्या वाचन यांवर भर
(३) तिसरी पायरी – ३ वर्षे (Middle Stage)
- Experimental Learning in Science, Math's & Arts, Social Science, Economics etc.
- ६ वी ते ८ वी मध्ये Vocational Courses असे विषय निवडता येणार आहेत
- १० दिवस Bagless Program – Vocational Courses (skilled based) चा अभ्यास करता येणार आहे. Ex. Laundry, Electrician, Plumber, Crafting etc.
- Internship Program.
(४) चौथी पायरी – ४ वर्षे (Secondary Stage)
- Multi-subjects study
- नियमित विषयांसोबत इतर विषय निवडण्याची मुभा.
नवीन शैक्षणिक धोरण २०२० - इतर महत्वाचे मुद्दे
- ९ वी आणि १० वी मध्ये गणित आणि विज्ञान विषयांसोबत इतर विषय उदा. संगीत, चित्रकला इ. विषय निवडता येणार आहेत.
- १० वी आणि १२ वीचे बोर्डच्या परीक्षांच महत्त्व कमी करण्यात आले आहेत.
- १० वी आणि १२ वीचे बोर्डच्या परीक्षा, सहामाही आणि वार्षिक (semester pattern) अश्या दोन भागात घेणार आहेत.
- १ ली ते ८ वी पर्यंत शिक्षण मातृभाषेत देण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे सुचविले आहे.
- १२ वी नंतर विद्यार्थ्याला एकूण १५ वर्षाचं Report Card मिळणार आहे.
- महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठीस्वतंत्र प्रवेश परीक्षा असेल आणि ती NTA मार्फत घेण्यात येईल.
- महाविद्यालयीन शिक्षणात वेगळे विषय निवडण्याची मुभा.
- संशोधनासाठी उच्चशिक्षण – ४ वर्षाचा पदवी अभ्यासक्रम
- नोकरीसाठी उच्चशिक्षण – ३ वर्षाचा पदवी अभ्यासक्रम
- संशोधनासाठी उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचा अतिरिक्त मास्टर्स अभ्यासक्रम असेल. आणि त्यानंतर पी.एच.डी. करू शकतील. त्यांना M. Phil ची आवश्यकता नाही.
- नवीन शैक्षणिक धोरणात यापुढे MPhil परीक्षा घेतल्या जाणार नाहीत.
- व्यावसायिक शिक्षण शालेय शिक्षणात समाविष्ट केले जाईल.
- Law आणि Medical शिक्षण वगळता इतर उच्च शिक्षण एका छताखाली येणार.
नवीन शैक्षणिक धोरण २०२० - निकाला संबंधी
Report Card
- पूर्वी – Grade/Marks आणि शिक्षकाचा शेरा
- नवीन धोरणानुसार - विद्यार्थी, वर्गमित्र आणि शिक्षकाचा शेरा
- वर्षभरातील शिकलेले नवीन कौशल्य
महाविद्यालयीन शिक्षण – Multi Entry-Exit Program
- 1st Year – Certificate
- 2nd Year – Diploma
- 3rd Year – Bachelor's Degree
- 4th Year – Researcher Bachelor's Degree
